About

नमस्कार मित्रांनो

आपली मायबोली म्हणजे मातृभाषा मराठी चा वापर आपण दैनंदिन आयुष्यात बोलताना लिहिताना करतोच परंतु सतत हातात असणाऱ्या मोबाईल ,कॉम्प्युटर आणि इंटरनेट या माहिती तंत्रज्ञानातील तीन महत्वाच्या घटकावर मराठी भाषा अत्यंत अल्प प्रमाणात वापरली जाते. इंटरनेटवर मराठीचा वापर वाढवून जगभरातील विविध क्षेत्रातील ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पटकन समजणाऱ्या मराठी भाषेत उपलब्ध व्हावे याकरिता डिजिटल मराठीचा हा उपक्रम . या ब्लॉगवर आपले मनःपूर्वक स्वागत. या ब्लॉगवर आपण कॉम्प्युटर व मोबाईलवर मिळणाऱ्या विविध सुविधा व टूल्स कसे वापरायचे हे मराठीतून शिकणार आहोत तसेच नवीन टेक्नोलॉजी, बिझनेस व विविध बुक्स , आरोग्य आणि इतर विषयांवरील उपयुक्त माहिती घेणार आहोत.

मराठी भाषेच्या उन्नतीसाठी समृद्धीसाठी अस्मितेसाठी व विकासासाठी योजिलेला हा उपक्रम आपल्याला नक्की आवडेल. इंटरनेट सुविधा व टूल्स आपण मराठीतून जास्तीत जास्त वापरलीत तरच आपली मराठी भाषा जागतिकीकरणाच्या जमान्यात टिकू शकेल.

वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

Scroll to Top